कृषिमंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात, कोणी केली टीका?

कृषिमंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात, कोणी केली टीका?

| Updated on: Sep 09, 2024 | 2:43 PM

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांना चांगलाच फटका बसला होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी धनंजय मुंडे खबरदारी घेतायत का? असा सवाल उपस्थित करत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतात कृषिमंत्री धनंजय मुंडेंवर काँग्रेस नेत्यानं हल्लाबोल केला आहे.

आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात सर्वच पक्ष संघटना सक्रिय झाल्या आहेत. अशातच आता परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच अनुषंगाने मतदारसंघात बैठका घेवून जनतेशी संवाद साधला जातोय. तर राजेसाहेब देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली आहे. दोन वर्षांपासून बीड जिल्ह्यात कोणताही पिक विमा शेतकऱ्यांना मिळत नाहीये. कृषिमंत्री केवळ एकट्यापुरते पाहतात त्यांची हुकूमशाही मतदार संघात असून अराजकतेचे राज्य सुरू असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. त्यामुळे इथला मतदार परिवर्तन करणार आहे. दरम्यान संध्याकाळी दर्शन घेऊन येणारे लोक कादर खानचा रोल करतात असं म्हणत देशमुख यांनी थेट धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे.

Published on: Sep 09, 2024 02:43 PM