अशोक चव्हाण यांच्यावर पाळत? घातपाताचा संशय व्यक्त करत पोलिसात तक्रार, काय म्हटले बघा
VIDEO | नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत नांदेड पोलिसांत रितसर नोंदवली तक्रार, काय म्हणाले अशोक चव्हाण?
नांदेड : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. माझ्यावर सतत एका अज्ञात व्यक्तीकडून पाळत ठेवली जात आहे. मी जिथे जिथे जाईन, तिथे मागे येते. मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. इतकेच नाहीतर ही व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी नांदेड पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे. याबाबत अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर ट्वीट करून याबद्दल सविस्तर सांगितले आहे. तर अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून गैरव्यवहार केला जात आहे

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं

आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
