“भाजपने सोडलेला वळू म्हणजे संभाजी भिडे”; काँग्रेस नेत्याचा आरोप
संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अमरावतीत काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर अनेक आरोप केले होते, याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने देखील पत्रकार परिषद घेत यशोमती ठाकूर यांच्यावरील आरोप फेटाळून लावले.
अमरावती, 03 ऑगस्ट 2023 | संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अमरावतीत काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर अनेक आरोप केले होते, याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने देखील पत्रकार परिषद घेत यशोमती ठाकूर यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. तसेच काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. संभाजी भिडे यांच्या माध्यमातून अमरावतीत द्वेष पसरवण्यासाठी हा डाव असून भाजप खासदार अनिल बोंडे आणि शिवराय कुळकर्णी हे महात्मा गांधीजी यांच्या विचारांचा खून करत आहेत. लोकांचे लक्ष भरकटविण्यासाठी संभाडी भिडे नावाचा वळू भाजपने सोडला आहे. अमरावतीत दंदल व्हावी यासाठी हे छडयंत्र सुरू असल्याचे सांगत थेट अमरावतीला दंगलीची प्रयोगशाळा करण्याचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी दिली.