‘रावण दोन लोकांचे ऐकायचा, पंतप्रधान मोदीही फक्त दोघांचंच ऐकतात’; राहुल गांधी यांचा खोचक टोला
VIDEO | काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मणिपूरच्या हिंसेवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल, सभागृहात आक्रमक होत भाजपला घेरलं
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2023 | ‘मणिपूरमध्ये तुम्ही भारतमातेची हत्या केली आहे. भारत एक आवाज आहे. त्या आवाजाची हत्या मणिपूरमध्ये करण्यात आली आहे.तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशप्रेमी नाही.’, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या हिंसेवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर मी काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये गेलो होतो. पण आमचे पंतप्रधान गेले नाही. कारण त्यांच्यासाठी मणिपूर म्हणजे भारत नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यासह रावणाप्रमाणे पंतप्रधान मोदी २ लोकांचं ऐकतात, असे म्हणत खोचक टोलाही लगावला. रावण केवळ दोन लोकांचं ऐकत होता. एक मेघनाथ आणि दुसरा कुंभकर्ण. त्याचप्रमाणे मोदी दोघांचं ऐकत आहे. एक म्हणजे अमित शाह आणि दुसरे म्हणजे अदानी. लंकेला हनुमानाने आग लावली नाही. अहंकाराने लंकेला जाळलं होतं. रामाने रावणाला मारलं नाही. अहंकाराने रावणाला मारलं. तुम्ही संपूर्ण देशात केरोसिन फेकत आहात. तुम्ही हरियाणाला जाळत आहात. तुम्ही संपूर्ण देशाला जाळण्याचं काम करत आहात,असे म्हणत राहुल गांधी मोदींवर आक्रमक होताना दिसले.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं

आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
