'ओबीसीच्या अस्मितेला धक्का लावाल तर...', जरांगे पाटील यांच्यासह शिंदे सरकारला कुणाचा इशारा?

‘ओबीसीच्या अस्मितेला धक्का लावाल तर…’, जरांगे पाटील यांच्यासह शिंदे सरकारला कुणाचा इशारा?

| Updated on: Sep 09, 2023 | 8:11 AM

VIDEO | 'ओबीसींच्या आरक्षणात ढवळाढवळ होत असेल तर खपवून घेणार नाही', माजी मंत्री आणि काग्रेस नेते सुनील केदार यांचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिंदे आणि फडणवीस सरकारला दिला थेट इशारा

नागपूर, ९ सप्टेंबर २०२३ | गेल्या बारा दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. गेल्या १२ दिवसांपासून त्यांचं हे उपोषण सुरू आहे. अशातच माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारला इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठी समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यामुळे सुनील केदार आक्रमक हे आक्रमक झाले आहेत. सुनील केदार म्हणाले, ‘सध्या कुणबी समाजाबद्दल जो उल्लेख होतोय. पण कुणबी समाज ओबीसीच्या आरक्षणात ढवळाढवळ होत असेल तर खपवून घेणार नाही. राज्य कुणावर लुटायचे लुटून टाकावं, पण आम्ही कुणबी समाजातले लोक समाजाच्या अस्मितेला धक्का लावू देणार नाही. याची मोठी किंमत मोजावी लागेल’, असे म्हणत त्यांनी इशाराच दिला आहे.

Published on: Sep 09, 2023 08:11 AM