काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार? नाना पटोले यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे धाव
VIDEO | प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलण्याची कुणी केली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे मागणी?
नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत हाय कमांडकडे धाव घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष पदावरून काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले यांना बदलण्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे मागणी केली. तर विजय वडेट्टीवार, सुनील केदार, संजय निरूपम आणि शिवाजीराव मोघे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल व्हावा म्हणून विजय वडेट्टीवार, सुनील केदार, संजय निरूपम आणि शिवाजीराव मोघे यांनी दिल्लीत धाव घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलण्याची मागणी केली. ते म्हणाले जर महाराष्ट्रातील काँग्रेसचं चित्र बदलायचं असेल तर नाना पटोले यांच्या जागी नवा चेहरा द्यावा, अशी मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. तर विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील वाद ही काही केल्या कमी होत नसतांना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत हाय कमांडकडे धाव घेत त्यांना पदावरून हटवण्याची थोडक्यात मागणी केली आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

