सत्तेत आल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची बैठक, या गुप्त भेटीवर नाना पटोले म्हणतात…
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये कोरेगाव पार्क येथे गुप्त बैठक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं भाष्य, काय दिली प्रतिक्रिया?
मुंबई, १२ ऑगस्ट २०२३ | अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथे गुप्त बैठक झाली. याबैठकीत जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने अजित पवार यांनी सत्तेत सहभागी व्हावं, असा प्रस्ताव शरद पवार यांच्यापुढे सादर केला. हा प्रस्ताव शरद पवार यांनी फेटाळला असून याबाबत माध्यमांना स्वत: स्पष्टीकरण देणार असल्याचं सांगितलं जात आहे. बंडानंतर झालेल्या पहिल्याच गुप्त भेटीनं राज्याच्या राजकारणा चर्चांना उधाण आलं. तर “मित्रपक्ष असलेले जे काही पक्ष आहेत त्यांचं त्यांच्या पातळीवर जी काही कामं असतील त्याकडे लक्ष देण्याची काँग्रेसची भूमिका नाही, याबाबत आधीही काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपच्या विरोधात जो पक्ष लढायला तयार असले त्याला आम्ही आमच्या सोबत घेऊन जावू, आमच्यासोबत असलेल्या पक्षांच्या संघटनात्मक चर्चेत आम्हाला पडण्याचं काही कारण नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपाच्या विरोधात ताकदीने लढण्याची तयारी ठेवणाऱ्या लोकांना आम्ही बरोबर घेऊन चालणार आहोत, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे कोण कुठे भेटलं याच्याशी आम्हाला काही घेणं नाही.”, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.