Special Report | मुंबई एसआयटी आणि एनसीबीमध्ये तपासाची शर्यत?
प्रकृती अस्वस्थ्याचे कारण देत पूजा ददलानीने मुंबई पोलिसांकडे आणखी वेळ मागितला आहे. पूजा ददलानी शाहरुख खानची मॅनेजर आहे. तर पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काशिफ खानच्या आमंत्रणावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावले आहे. मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रकृती अस्वस्थ्याचे कारण देत पूजा ददलानीने मुंबई पोलिसांकडे आणखी वेळ मागितला आहे. पूजा ददलानी शाहरुख खानची मॅनेजर आहे. तर पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काशिफ खानच्या आमंत्रणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. मी काशिफ खान नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. त्याला मी कधीच भेटलो नाही. त्याने मला पार्टीला बोलावलं होतं. मी पालकमंत्री आहे. त्यामुळे अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणे मला या पार्टीचंही आमंत्रण होतं. या प्रकरणात षडयंत्र होतं की नाही याचा एजन्सी तपास करत आहे, असं अस्लम शेख म्हणाले.
Latest Videos