मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी बातमी, क्युरेटिव्ह पिटीशन कोर्टानं स्वीकरलं, आता पुढे काय?

मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी बातमी, क्युरेटिव्ह पिटीशन कोर्टानं स्वीकरलं, आता पुढे काय?

| Updated on: Dec 23, 2023 | 5:09 PM

मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा बाजू ऐकून घेतली जावी म्हणून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. त्यामुळे सरकारला पुन्हा आपले तगडे पुरावे सादर करता येणार

नवी दिल्ली, २३ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाचं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा बाजू ऐकून घेतली जावी म्हणून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. त्यामुळे सरकारला पुन्हा आपले तगडे पुरावे सादर करता येणार आहे. तसेच येत्या 24 जानेवारी रोजी यावर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायाधीश संजय कौल, संजीव खन्ना आणि बीआर गवई यांच्या समक्ष ही सुनावणी पार पडेल.

Published on: Dec 23, 2023 05:09 PM