Monsoon Trip : पुण्यातील ‘या’ 8 ठिकाणांवर पिकनिकला जाताय? मग तुम्हाला ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण…
तुम्ही पुण्यातील काही पर्यटनस्थळांवर पिकनिक प्लान करत असाल तर ही बातमी नक्की जाणून घ्या... पुण्यातील गड किल्ले, पर्यटनस्थळं, धरणे, धबधबे अशा परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. भूमी डॅम येथे घडलेल्या घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.
राज्यातील पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही पुण्यातील काही पर्यटनस्थळांवर पिकनिक प्लान करत असाल तर ही बातमी नक्की जाणून घ्या… पुण्यातील गड किल्ले, पर्यटनस्थळं, धरणे, धबधबे अशा परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. भूमी डॅम येथे घडलेल्या घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. पुण्यातील ८ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर वेल्हा या ठिकाणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. अपघात टाळण्यासाठी आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची प्रशासनाकडून वर्गवारी करण्यात येणार आहे. त्यात अ (अधिक गर्दीचे), ब (मध्यम गर्दीचे) आणि क (कमी गर्दीचे) अशा तीन प्रकारात वर्गवारी करत उपाययोजना करण्यात येणार आहे.