Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुका कधी लागणार? अजित पवार यांनी म्हटलं, आचारसंहिता....

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुका कधी लागणार? अजित पवार यांनी म्हटलं, आचारसंहिता….

| Updated on: Jan 20, 2024 | 6:21 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकांवर भाष्य केले आहे. लवकरच लोकसभा निवडणूक लागणार असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मुंबई, २० जानेवारी २०२४ : देशात एकीकडे अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण अवघ्या काही तासांवर आलं आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे राज्यात मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकांवर भाष्य केले आहे. लवकरच लोकसभा निवडणूक लागणार असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल असा माझा अंदाज आहे. तर एप्रिल महिन्याच्या शेवटी लोकसभेच्या निवडणुका होतील, असे वक्तव्य करत अजित पवार यांनी शक्यता वर्तविली आहे.

Published on: Jan 20, 2024 06:21 PM