‘जनाब’वरून ठाकरे आणि फडणवीस आमने-सामने, उर्दू बॅनरवरून खडाजंगी
VIDEO | मालेगावातील उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या उर्दू बॅनरवरून देवेंद्र फडणवीस यांची टीका, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुंबई : रत्नागिरीच्या खेडमधील जाहीर सभेनंतर उद्धव ठाकरे यांची मालेगाव मध्ये जाहीर सभा झाली. या सभेला जास्तीत जास्त उपस्थिती असावी यामुळे ठाकरे गटाकडून मुस्लिम बहुल भागात उर्दू भाषेत बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरवर जनाब उद्धव ठाकरे असा उल्लेख करण्यात आला होता. यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान या टीकेवर ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांना देखील यापूर्वी जनाब असा उल्लेख झाल्याचे फोटो सोशल मीडियावर ट्वीट करण्यात आले आहे. ठाकरे यांच्या सभेबरोबरच सभेचे उर्दू बॅनर आणि जनाब ठाकरे या शब्दावर भाजपने जोरदार निशाणा साधला. मालेगाव मुस्लिम भाग असल्याने ठाकरेंच्या सभेचे काही भागात उर्दू भाषेत बॅनर लावले. यावरील जनाब ठाकरे हा शब्दू उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतो का? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. बघा यासंदर्भातील टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट