देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण अन्… अमृता फडणवीस यांची उखाण्यातून विरोधकांवर टोलेबाजी

| Updated on: Feb 06, 2024 | 5:30 PM

नागपुरात भारतीय जानता पक्षाचा महिला आघाडीच्यावतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वान हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यक्रमात महिलांशी साधला संवाद

नागपूर, ६ फेब्रुवारी, २०२४ : नागपुरात भारतीय जानता पक्षाचा महिला आघाडीच्यावतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वान हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यक्रमात महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांचा आग्रहावर एक गाणंही गायलं यासह त्यांनी एक उखाणाही घेतला. ‘देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचे वान” आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण’, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या होम मिनिस्टर अमृता फडणवीस यांनी उखाण्यातून विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्या महिलांसाठी असणाऱ्या अनेक योजना आणि महिलांना समाजात सन्माने उभं राहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं.

Published on: Feb 06, 2024 05:30 PM