Ladki bahin yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, कधी मिळणार 2100 रूपये? एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं…
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना २१०० रूपये कधी देण्यात येणार यासंदर्भात विरोधकांकडून विचारणा होत असताना सरकारकडून यासंदर्भात थेट उत्तर दिले जात आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांवर निवेदन केलं. यावेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी द्यायचे याबद्दल आम्ही निर्णय घेऊ. पैसे देणार नाही असं आम्ही म्हंटलेलं नाही, असं अजित पवार म्हणाले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, आर्थिक परिस्थिती बघून आम्ही 2100 रूपये देऊ. सगळे सोंग आणता येतात, पण पैशांचं सोंग करता येत नाही. त्यापद्धतीने आमचं काम सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी काल सभागृहात दिल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना 2100 कधी देणार? यासंदर्भात माहिती दिली. ‘कोणत्याही योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना 1500 रूपये देणं सुरू आहे आणि अजित दादांनी ज्या प्रमाणे सांगितलं की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर महिलांना 2100 रूपये देऊ, कारण ही वस्तुस्थिती आहे. ‘, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले तर महाराष्ट्र देशात पहिल्या नंबरचं राज्य आहे. महाराष्ट्राचा जीडीपी नंबर एक आहे. स्टार्टअपसह एफडीआयमध्ये नंबर एक आहोत, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

