साताऱ्यातील मन हेलावणारा व्हिडिओ व्हायरल अन् ‘त्या’मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
अखेर तीन वर्षाच्या मुलाला आणि त्यांच्या कुटुंबाला टीव्ही नाईनच्या बातमीमुळे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय आधार दिला असल्याचे पाहायला मिळत आहे.
साताऱ्याच्या महाबळेश्वरमधला दानवली या दुर्गम खेडेगावातील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या 3 वर्षांच्या चिमूकल्याला चक्क भर उन्हात दगडाला बांधून ठेवत मजुरी करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसतंय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीव्ही 9 वृत्तवाहिने दखल घेत बातमी दाखवली आणि याच बातमीची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि 24 तासाच्या आत सातारा जिल्ह्यातून चव्हाण कुटुंबियांना आणि त्या लहानग्या मुलाला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात सर्वाओतपरी वैद्यकीय खर्च करण्यास पुढाकार घेतला.
सातारा जिल्ह्यातील पातेपूर या गावातील अक्षय चव्हाण आपल्या पत्नीसोबत मजुरी करत असतात. त्याना तीन वर्षाचा निलेश नावाचा मुलगा आहे. मात्र या मुलाला एकता आणि बोलता येत नाही. तसेच दिवसभर आई-वडील काम करत असताना मुलगा कुठे जाऊ नये म्हणून मुलाला दोरीच्या सहाय्याने दगडाला बांधून ठेवले जाते. आई आपल्या पोटच्या पोरासाठी मजुरी करते आणि याचीच दखल आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या तीन वर्षीय मुलाचा सर्व वैद्यकीय खर्च करणार असल्याचं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले आहे.

'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
