दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक, काय आहे कारण?

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक, काय आहे कारण?

| Updated on: Feb 26, 2023 | 8:26 PM

VIDEO | देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून मोठी आणि महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षण मंत्री देखील आहेत. मद्य घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता. अशातच ईडी आणि सीबीआयकडून त्यांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. गेल्या आठ तासांपासून त्यांची ही चौकशी सुरु होती. या चौकशीनंतर मनीष सिसोदिया यांना आता सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यानंतर मनीष सिसोदिया यांना किती दिवस कोठडी दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Published on: Feb 26, 2023 08:23 PM