पंतप्रधान मोदींच्या कामाचा हवाला देत, फडणवीस यांच्याकडून यूपीए सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “यूपीए सरकारची ओळख…”
आज मुंबईत भाजपची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनभरून पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केले आहे आणि यूपीए सरकारची ओळख लकवा सरकार म्हणून होती, अशी टीका ही त्यांनी केली आहे.
मुंबई : आज मुंबईत भाजपची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनभरून पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केले आहे आणि यूपीए सरकारची ओळख लकवा सरकार म्हणून होती, अशी टीका ही त्यांनी केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर मागील नऊ वर्षांमध्ये अतिशय गतिमान निर्णय प्रक्रिया आपण बघितली. प्रचंड विकास आपण पाहिला.कुठल्याही प्रकारे एक डाग, एक बोट सरकारवर कोणी लावू शकलं नाही. भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं, आणि तंत्रज्ञानाचा उपगोय करून गरीब कल्याणाचा अजेंडा चालवत असताना गरिबांपर्यंत त्यांचे अधिकार पहिल्यांदा पोहोचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. महाराष्ट्रात कोरोनाच्या जास्तीत जास्त लसी देण्याचं काम पंतप्रधान मोदींच्या सरकारने केलं. पंतप्रधान आवास योजनेत महाराष्ट्रात 25 लाख घर बांधून झाली आणि अजून काम सुरु आहेत, उज्जवला योजनेमुळे अनेक महिलांना फायदा मिळाला. 5 लाख फेरिवाल्यांनाही मोदी सरकारच्या काळात मदत मिळाली. पीएम किसान योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार थेट जातात, मुद्रा योजनेमुळे अनेक उद्योजकांना फायदा झाला, अशा अनेक योजनांचा महाराष्ट्रात गरिबांना फायदा झाला. गेल्या नऊ वर्षांमध्ये आपण केंद्र सरकारच्या माध्यामतून महाराष्ट्रात अनेक विकास काम केलेली आहेत. एकीकडे विकास आणि दुसरीकडे सामान्य जनतेचं कल्याण असं हे सरकार आहे. खऱ्या अर्थानं नवा भारत घडताना आम्ही पाहतोय, यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. 2014 पूर्वीचा भारत आणि 2023 मधील भारत यामधील फरक आपण बघतोय. यूपीए सरकारची ओळख लकवा सरकार म्हणून होती”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.