धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड अन् हाणामारी
धनगर समाजाचे कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन धडकले असता काही संतप्त मोर्चेकऱ्यांनी गेटवर चढून आत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनांची तोडफोड केली. या जिल्हाधिकारी ऑफिसजवळ पोलिसांनी धाव घेतली आणि हस्तक्षेप करत आंदोलकांना शांत करण्यास सुरुवात केली
जालना, २१ नोव्हेंबर २०२३ : धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाला आज हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. जालन्यात आज धनगर समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता. त्यावेळी मोर्च्यात सहभागी असणाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला केला. यावेळी कार्यालयाची तोडफोड करत काचाही फोडल्या तर यावेळी वाहनांची तोडफोड केल्याचेही पाहायला मिळाले. धनगर समाजाचे कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन धडकले असता काही संतप्त मोर्चेकऱ्यांनी गेटवर चढून आत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनांची तोडफोड केली. या जिल्हाधिकारी ऑफिसजवळ पोलिसांनी धाव घेतली आणि हस्तक्षेप करत आंदोलकांना शांत करण्यास सुरुवात केली. शांततेत सुरू असलेल्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागल्याने या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

