१६ आमदारांच्या पात्र, अपात्रेसंदर्भात मोठी बातमी, काय झाला पुढचा निर्णय?
VIDEO | विधानसभा अध्यक्षांकडून १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला वेग
मुंबई : १६ आमदारांच्या पात्र, अपात्रेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा अध्यक्षांकडून १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला वेग आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. यासह उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देखील दिली जाणार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी केली केली आहे. यानंतर शिवसेनेच्या घटनेच्या प्रती मिळाल्यानंतर अध्यक्षीयांकडून या घटनेचा अभ्यास केला जाईल, यानंतर खरी शिवसेना कुणाची याचा निर्णयही दिला जाईल. यानंतर जर एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांना झालेल्या निर्णयावर आक्षेप असेल तर या दोन्ही पक्षाध्यक्षांना समोरा-समोर आपले म्हणणं मांडण्याची संधी देखील दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.