हिरव्या रानात वारकऱ्यांची मांदियाळी… दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
विठूरायाच्या भेटीसाठी, त्याच्या ओढीने निघालेले वारकरी उत्साहाने या घाटात चढण सहजतेने पार करतात.या घाटातील वारीचं दृश्य पाहणं ही एक अविस्मरणीय पर्वणीच असते. जे वारकरी वारीत सहभागी होतात त्यांना याची देही याची डोळा अनुभव घेता येतो. असाच काहीसा नजारा ड्रोनमध्ये कैद करण्यात आला आहे
वारी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे लाखो वारकऱ्यांचा संत ज्ञानेश्वर आणि तुकोबा माऊलींच्या नामाचा जयजयकार, वारकऱ्यांचा उत्साह, विठूनामाचा अखंड जयघोष, टाळ-मृदुंगाचा गजर आणि अभंगात तल्लीन झालेले वारकरी आणि सावळा विठ्ठल हे सर्वकाही… विठूनामाच्या गजरात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांसह संताच्या पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. आळंदीतून ही पालखी दिवे घाटातून जात असते. दिवे घाटातून पालखी जात असताना वारकऱ्यांचा उत्साह काही औरच असतो. विठूरायाच्या भेटीसाठी, त्याच्या ओढीने निघालेले वारकरी उत्साहाने या घाटात चढण सहजतेने पार करतात.या घाटातील वारीचं दृश्य पाहणं ही एक अविस्मरणीय पर्वणीच असते. जे वारकरी वारीत सहभागी होतात त्यांना याची देही याची डोळा अनुभव घेता येतो. असाच काहीसा नजारा ड्रोनमध्ये कैद करण्यात आला आहे. बघा व्हिडीओ
Published on: Jul 02, 2024 05:03 PM
Latest Videos