‘लाडकी बहीण’च्या लाभासाठी महिलांची झुंबड… सरकारनं बदलला निर्णय, ‘या’ कागदपत्रांशिवाय मिळणार 1500 रुपये

Cm Ladki Bahin Yojana For Women : लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईलसाठी लांबच्या लांब रांगा लागल्यात. त्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला. या दोन्ही दाखल्यांची अट सरकारने शिथिल केली. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी....

'लाडकी बहीण'च्या लाभासाठी महिलांची झुंबड... सरकारनं बदलला निर्णय, 'या' कागदपत्रांशिवाय मिळणार 1500 रुपये
| Updated on: Jul 03, 2024 | 10:47 AM

सरकारने महिलांना दर महिन्याला १५०० रूपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि नोंदणीसाठी तहसील कार्यालयात महिलांची अक्षरक्षः झुंबड उडाली. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईलसाठी लांबच्या लांब रांगा लागल्यात. त्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला. या दोन्ही दाखल्यांची अट सरकारने शिथिल केली. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी १५ जुलैपर्यत शेवटची तारीख होती. पण अखेर सरकारने महिलांच्या अडचणी लक्षात घेता ही तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली. लाडकी बहीण योजनेत सरकारने मोठा बदल केला असून डोमेसाईल सर्टिफिकेट ऐवजी १५ वर्ष जुनं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देता येईल तर अडीच लाखांच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आता पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली आहे. बघा लाडकी बहीण योजनेतील अटींमध्ये सरकारने कोणता केला बदल?

Follow us
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.
वर्ल्डकप जिंकल्यानं या खेळाडूना सरकारकडून बक्कळ पैसा, इतके कोटी देणार
वर्ल्डकप जिंकल्यानं या खेळाडूना सरकारकडून बक्कळ पैसा, इतके कोटी देणार.