NASA तील भारतीय वंशाच्या महिला अधिकाऱ्याला थेट नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प; कोण आहेत नीला राजेंद्र?
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने भारतीय वंशाच्या DEI प्रमुख नीला राजेंद्र यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. कारण नेमकं काय बघा व्हिडीओ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका नासामध्ये कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना बसल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांच्या आदेशानंतर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात नासा येथे विविधता, समता आणि समावेशन म्हणजे DEI येथे नीला राजेंद्र या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. मात्र त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला. जेपीएलने ई-मेल पाठवून नीला राजेंद्र यांना कामावरून काढल्याची माहिती आहे.
नासामधील डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन (DEI) मध्ये त्या प्रमुख पदावर असून नीला राजेंद्र या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार, सर्व फेडरल एजन्सींमधील DEI कार्यक्रम समाप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कार्यक्षमता विभागाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्या भूमिकेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून ट्रम्प आणि मस्क हे दोघे DEI या उपक्रमांचे विरोधत आहेत.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!

