ठरलं? महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटाकडून लोकसभा लढवणार?
ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढणार आहेत. चंद्रहार पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी त्यावेळी मोठं शक्तिप्रदर्शन करत ठाकरे गटात प्रवेश केला
मुंबई, १७ मार्च २०२४ : सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढणार आहेत. चंद्रहार पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी त्यावेळी मोठं शक्तिप्रदर्शन करत ठाकरे गटात प्रवेश केला होता. दरम्यान, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी 11 मार्च रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानले. उद्धव ठाकरे यांनी आपला केलेला सन्मान हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.