बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महानिर्वाण दिन साजरा केला जात आहे. भारताच्या संविधानाचे जनक असणाऱ्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभुमीवर एकच गर्दी केली आहे. तर गेल्या दोन ते तीन दिवसापासूनच मुंबई महापालिकेकडून विशेष तयारी केली जात असून ठिक-ठिकाणी मदत कक्ष देखील उभारण्यात आले आहे.
मुंबई, ६ डिसेंबर २०२३ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महानिर्वाण दिन साजरा केला जात आहे. भारताच्या संविधानाचे जनक असणाऱ्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभुमीवर एकच गर्दी केली आहे. आज दादरच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्यपाल देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभुमीवर दाखल झाले आहेत. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त्याने आंबेडकर अनुयायांची एकच गर्दी चैत्यभुमीवर उसळली आहे. दादर येथील वरळी, प्रभादेवी या ठिकाणाहून या अनुयायांच्या रांगा रात्रीपासून पाहायला मिळत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासूनच मुंबई महापालिकेकडून विशेष तयारी केली जात असून ठिक-ठिकाणी मदत कक्ष देखील उभारण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आल्या असून सगळी परिस्थिती सुरळीत राहवी यासाठी पोलिसांची मोठी फौज ठिक-ठिकाणी तैनात कऱण्यात आली आहे.