Jet Airways चे संस्थापक नरेश गोयल यांना ED कडून अटक, इतक्या कोटींच्या फसवणुकीचा आरोप

Jet Airways चे संस्थापक नरेश गोयल यांना ED कडून अटक, इतक्या कोटींच्या फसवणुकीचा आरोप

| Updated on: Sep 02, 2023 | 12:05 AM

VIDEO | जेट एअरवेजचे संस्थापक नरेश यांना शुक्रवारी सकाळी ईडी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावले होते. यापूर्वी दोनदा त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले मात्र ते हजर झाले नाही, अखेर आजच्या चौकशीनंतर त्यांना अटक झाली.

मुंबई, १ सप्टेंबर २०२३ | ईडीकडून आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीने आज अटक केली आहे. त्यांच्यावर 538 कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अटक करण्यापूर्वी आज त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी गोयल यांना चौकशीसाठी बोलावले होते. यापूर्वी ते दोनदा ईडीसमोर हजर झाले नव्हते. मात्र आज त्यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी 5 मे रोजी नरेश गोयल यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या कार्यालयांसह मुंबईतील सात ठिकाणी झडती घेतली असल्याची माहितीही समोर येत आहे.

Published on: Sep 02, 2023 12:05 AM