ठाकरे गटाच्या मागे साडेसाती? किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून समन्स, काय आहे प्रकरण?
ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. कोरोना काळातील कथित बॉडी बँग घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून किशोरी पेडणेकर यांना ईडीने हे समन्स बजावले आहे.
मुंबई, १९ जानेवारी २०२४ : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावल्याच्या काही क्षणातच ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. कोरोना काळातील कथित बॉडी बँग घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून किशोरी पेडणेकर यांना ईडीने हे समन्स बजावले आहे. येत्या गुरूवारी किशोरी पेडणकर यांनी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. ईडीने समन्स बजावल्यानंतर किशोरी पेडणेकर यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही तर माझ्या हातात जेव्हा ईडीचं समन्स येईल तेव्हा यावर भाष्य करणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही नेत्यांवर चौकशीचा चांगलाच ससेमिरा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार की ठाकरे गटातील नेते यासर्व घडामोडींना सामोरे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.