छगन भुजबळ यांना भडक बोलण्याची सवय, मराठ्यांच्या आरक्षणावरून भुजबळ यांच्यावर शिंदेंच्या मंत्र्याचा पलटवार

छगन भुजबळ यांना भडक बोलण्याची सवय, मराठ्यांच्या आरक्षणावरून भुजबळ यांच्यावर शिंदेंच्या मंत्र्याचा पलटवार

| Updated on: Nov 08, 2023 | 10:33 AM

मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारणात अद्याप टीका-टिप्पणी सरू आहे. मराठा आरक्षणाचा तिढा कायम असताना कुणबींच्या नोंदींवरून दाखले देण्यास मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावरून शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर देत पलटवार केलाय.

मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३ | कुणबींच्या नोंदींवरून दाखले देण्यास मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावरून शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर देत पलटवार केलाय. छगन भुजबळ यांना भडक बोलण्याची सवय आहे. जे होणार नाही ते होणार आहे, असे सांगून आपण मोठे आहोत हे दाखवण्याचा भुजबळ यांचा प्रयत्न असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी सरकारने निवृत्त न्यायमूर्तींना पाठवलं होतं. यावरही भूजबळ यांनी टीका केली होती. याला देखील शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. तर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया स्वाभाविक असून सरकारचा ओबीसी विरूद्ध मराठा असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल विरोधी पक्ष नेत्यांनी केलाय. बघा काय म्हणाले विरोधी पक्ष नेते?

Published on: Nov 08, 2023 10:29 AM