Video : एकनाथ शिंदेंची नाराजी, दिल्लीसह मुंबईत बैठकींचं सत्र
महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार की काय? अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नाराजीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजधानी दिल्लीत जे पी नड्डा (J.P.Nadda) यांच्या बंगल्यावर तातडीची बैठक सुरु आहे. दरम्यान, पहाटे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते हे दिल्लीसाठी रवाना झाले होते. तर शरद […]
महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार की काय? अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नाराजीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजधानी दिल्लीत जे पी नड्डा (J.P.Nadda) यांच्या बंगल्यावर तातडीची बैठक सुरु आहे. दरम्यान, पहाटे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते हे दिल्लीसाठी रवाना झाले होते. तर शरद पवारही दिल्लीत गेल्याची माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून दिली होती. त्यानंतर आता जे पी नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांची खलबतं सुरु आहेत. एकनाथ शिंदे हे सूरतमध्ये असून त्यांच्यासह असलेल्या आमदारांना अहमदाबादला अमित शाह यांच्या भेटीला आणलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

