हे माझं भाग्य… गायिका अनुराधा पौडवाल यांचा मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश, आगामी लोकसभा लढवणार?
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी एका मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश... आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनुराधा पैडवाल यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, इतकंच नाही तर त्या भाजपाच्या स्टार प्रचारक होऊ शकतात, अशीही चर्चा दबक्या आवाज सुरू आहे.
नवी दिल्ली, १६ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी एका मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. आज (शनिवार) भारतीय जनता पार्टीत अनुराधा पौडवाल यांनी प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव, मीडिया प्रमुख अनिल बालून आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांच्या उपस्थितीत अनुराधा यांनी हा पक्षप्रवेश केला. अनुराधा पौडवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर एकच चर्चांना उधाणा आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनुराधा पैडवाल यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, इतकंच नाही तर त्या भाजपाच्या स्टार प्रचारक होऊ शकतात, अशीही चर्चा दबक्या आवाज सुरू आहे. दरम्यान, भाजपच्या या पक्षप्रवेशांनंतर अनुराधा पौडवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “मला या गोष्टीचा आनंद आहे की मी अशा सरकारमध्ये भाग घेतेय, ज्याचा सनातन धर्माशी दृढ नातं आहे. आज मी भाजपात प्रवेश करतेय, हे माझं भाग्यच आहे.” लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात पुढे त्यांनी असेही म्हटले की, मला त्याविषयी अद्याप काही माहीत नाही. वरिष्ठ नेतेमंडळी जे सांगतील ते मला मान्य असेल.