VIDEO : Fast News | महत्वाच्या बातम्या | 02 June 2022
गोपीचंद पडळकर यांनी एक ट्वीट करत राज्याचे राजकारण चांगलेच तापवले आहे. पडळकऱ्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, शेकडो हिंदुंचा बळी घेणाऱ्या मुंबई ब्लास्टचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक व्यवहार करणारे नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीत पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून रोखले.
गोपीचंद पडळकर यांनी एक ट्वीट करत राज्याचे राजकारण चांगलेच तापवले आहे. पडळकऱ्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, शेकडो हिंदुंचा बळी घेणाऱ्या मुंबई ब्लास्टचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक व्यवहार करणारे नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीत पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून रोखले. हिंदू राजमाता जयंती म्हणजे यांना नातवाला लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो? जेव्हा हिंदु मंदिरं लुटली जात होती, तेव्हा अहिल्यादेवींनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्यादेवी प्रेमींची भावना आहे की, अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला, त्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे.’
Published on: Jun 02, 2022 02:37 PM
Latest Videos