Dharavi Blast : धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा लागोपाठ भीषण स्फोट, क्षणार्धात सगळं भस्मसात अन् …
283 सिलिंडर पोलिसांनी जप्त करून धारावी पोलीस ठाण्यात हलवले आहे, नेचर पार्क परिसरात अजूनही सिलिंडर असण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम सुरू आहे.
मुंबईतील धारावी सायन PNGP कॉलनीत काल रात्री झाला सिलेंडर स्फोटाची भीषण घटना घडली. नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये सिलिंडर ठेवले होते, त्यातील एकाचा स्फोट झाल्यामुळे लागोपाठ 10 हून अधिक सिलिंडरचा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. मुंबईत झालेल्या या सिलिंडर स्फोटाने परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. 24 तास उलटल्यानंतरही अद्याप अग्नीशामक दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. स्फोटामुळे परिसरात उडलेल्या सिलिंडरचा शोध घेऊन सिलेंडरवर पाणी मारत कुलिंग करायचं काम केले जात आहे. सायन PNGP कॉलनीत काल रात्री सिलिंडरच्या स्फोटाची भीषण घटना घडली होती. नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये असलेल्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने आजूबाजूच्या शंभर मीटरपर्यंत उभ्या असलेल्या गाड्या आणि ट्रकही या भीषण आगीत भस्मसात झाल्याची माहिती आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून नागरिक घर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झालेत. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी फायर ब्रिगेड आणि पोलीस तपास करत आहेत.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
