G- 20 | पुण्यात पालखी सोहळ्यासाठी परदेशी पाहुण्यांसाठी कशी आहे व्यवस्था?

G- 20 | पुण्यात पालखी सोहळ्यासाठी परदेशी पाहुण्यांसाठी कशी आहे व्यवस्था?

| Updated on: Jun 12, 2023 | 4:54 PM

VIDEO | G- 20 साठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनाही पाहता येणार पालखी सोहळा, पुण्यात खास व्यवस्था

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून यंदा लाइव्ह लोकेशन सुविधेचा वापर करण्यात येणार आहे. पालखी मार्गस्थ होणारे रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी एकदम चोख व्यवस्था असताना G- 20 साठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनाही आता पालखी सोहळा पाहता येणार आहे. कारण त्यासाठी तशी खास व्यवस्थाही करण्यात आली आहे. पुण्यात G- 20 दुसरी देशातील परिषद सध्या सुरू आहे आणि याच परदेशी पाहुण्यांना आता या पालखी सोहळ्याचा नयनरम्य देखावा याची देही याची डोळा पाहता येणार आहे.

Published on: Jun 12, 2023 04:54 PM