Special Report : 1983 चा विश्वकप विजेता संघ महिला पैलवानांसोबत, केंद्र सरकारला केलं ‘हे’ आवाहन
VIDEO | महिला कुस्तीपटूंना माजी क्रिकेटपटूंचा पाठिंबा, काय आहे कारण, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना माजी क्रिकेटपटूंनी पाठिंबा दिलाय. १९८३ साली ज्या खेळाडूंनी विश्वकप जिंकला होता. त्यापैकी अनेक खेळाडूंनी सामुहिक पत्र सादर करून केंद्र सरकारला या प्रकरणाकडे लक्ष देण्याचे आवाहन केलंय. 1983 चा विश्वकप विजेता भारतीय संघाने महिला कुस्तीपटूंना समर्थन दिलंय. एकीकडे या प्रकरणात दिग्गज खेळाडू का उतरत नाही, याची चर्चा होताना 1983 चा विश्वकप विजेता संघाने एक सेटमेंट काढून या महिला आंदोलक खेळाडूंची केंद्र सरकारने दखल घ्यावी, अशी विनंती केलीये. ‘खेळाडूंसोबत जे झालं ते चुकीचं आहे. त्यांनी देशाची मान जगभरात उंचावलीय. त्यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र सरकारनं तातडीनं दखल घ्यावी. आमचा आंदोलक खेळाडूंनाही आग्रह आहे की, त्यांनी घाईघाईनं कोणताही निर्णय घेऊ नये. आम्ही आशा करतो की सरकार आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेईल’, असे त्यामध्ये म्हटलंय. भाजप खासदार ब्रृजभूषण सिंह यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास आंदोलक खेळाडूंनी पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. पण या आंदोलकाच्या समर्थनात कोणते भारतीय खेळाडू आहेत बघा स्पेशल रिपोर्ट….