किशोरी पेडणकर यांना ‘या’ तारखेपर्यंत अटकेपासून न्यायालयाकडून दिलासा, काय आहे प्रकरण?
VIDEO | न्यायालयाचा मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा, काय आहे नेमकं प्रकरण आणि कसा दाखल झाला किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा?
मुंबई, २४ ऑगस्ट २०२३ | कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी किशोरी पेडणकर यांना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. २९ ऑगस्टपर्यंत कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गाच्यावेळी कोव्हिड उपचारांच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती. पण ही खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. बॉडी बॅगज खरेदीतही घोटाळा झाला होता. बॉडी बॅग खरेदीबाबत यापूर्वी ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली होती. त्यानुसार 2 हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना विकत घेण्यात आली होती. हे कंत्राट देताना महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. या प्रकरणी हा गुन्हा आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

