‘सध्या जे सुरूये, ते घातक…मी आता विधानसभा लढणार नाही’, शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'निवडणुकीत जात, धर्म आणला जातोय. जे काही सुरू आहे सध्या त्यावरून कोणीही कोणावरही विश्वास ठेवणार नाही, अशी स्थिती आहे. आणि अशी स्थिती भविष्यासाठी घातक आहे.', असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.
सध्या जे राजकारण सुरू आहे ते भविष्यासाठी घातक असल्याचे मोठं वक्तव्य माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलंय. इतकंच नाहीतर यापुढे मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, अशी मोठी घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली. ‘निवडणुकीत जात, धर्म आणला जातोय. जे काही सुरू आहे सध्या त्यावरून कोणीही कोणावरही विश्वास ठेवणार नाही, अशी स्थिती आहे. आणि अशी स्थिती भविष्यासाठी घातक आहे.’, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून अब्दुल सत्तार यांना डच्चू देण्यात आल्यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चा होत होत्या. अशातच त्यांनी आपण यापुढे निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. तर “सिल्लोडची विधानसभा निवडणूक लढणार नाही. जी संधी मिळाली त्याबद्दल आभारी आहे. आपल्या लोकांना विकास नको तर फक्त जातीयवाद पाहिजे. जातीयवादामध्ये माणूसकीही सोडून द्यावी लागते.”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.