चंद्रकांत खैरे यंदाची लोकसभा लढवणार की नाही? ज्योतिषांनी काय सांगितलं भाकित?
अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पद आहे. विरोधी पक्ष नेते हे मुख्यमंत्र्यांच्या समानतेचं पद असतं. असं असताना आता त्यांना काय हवंय? असा खोचक सवाल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांना अप्रत्यक्षपणे केलाय.
छत्रपती संभाजीनगर, १६ मार्च २०२४ : शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटातील धुसफूस पण चव्हाट्यावर आली असताना चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पद आहे. विरोधी पक्ष नेते हे मुख्यमंत्र्यांच्या समानतेचं पद असतं. असं असताना आता त्यांना काय हवंय? असा खोचक सवाल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांना अप्रत्यक्षपणे केलाय. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या लोकसभा उमेदवारीवर देखील भाष्य केले आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, तुझ्या नशिबात असेल तर मला द्यावं लागेल माझ्या नशिबात नसले तर नाही, माझ्या नशिबात मागच्या वेळेचे लोकसभा निवडणूक होती पण त्यावेळी डावपेचानं मला दूर करण्यात आलं. मी आता ते मागचं काढत नाही. पण आता माझ्या नशिबात यंदाची लोकसभा आहे. मला अनेक ज्योतिष्यांनी, पंडितांनी मला सांगितलं आताची लोकसभा तुमच्या नशिबात आहे.’