पुण्यात वारंवार आगीच्या घटना !

पुण्यात वारंवार आगीच्या घटना !

| Updated on: Apr 26, 2022 | 7:03 PM

आगीच्या घटनेची दाहकताही बरीच मोठी आहे. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ही भीषण आगीची घटना आता पुण्यातल्या कोंढवा परिसरात घडल्याने या परिसरातील नागरिक सध्या चिंतेत आहेत.

पुणे : पुण्यात (Pune) गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस आगीच्या (Pune Fire) घटना वाढत चालल्या आहेत. कधी रुग्णालयाला आग (Fire) तर कधी रहिवाशी इमारतीला आग, अशा घटना वारंवार घडत असल्याने पुणेकरांची डोकेदुखी सध्या चांगलीच वाढली आहे. या आगीच्या घटना नियंत्रणात येताना दिसत येत नाहीत, कारण आज पुन्हा पुण्यात मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीच्या घटनेची दाहकताही बरीच मोठी आहे. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ही भीषण आगीची घटना आता पुण्यातल्या कोंढवा परिसरात घडल्याने या परिसरातील नागरिक सध्या चिंतेत आहेत.

Published on: Apr 26, 2022 07:03 PM