पुण्यात इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 115 रुपये लिटरवर
देशासह राज्यात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये आज आठव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांनी वाढ झाली आहे. पुण्यात पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत.
देशासह राज्यात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये आज आठव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये पेट्रोलचे दर सहा रुपयांनी वाढले आहेत. नव्या इंधन दरानुसार पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 115 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर 97.46 रुपये इतका झाला आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने यााच मोठा आर्थिक फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.
Latest Videos
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा

