Ganesh Chaturthi 2023 : आधी लगीन कोंढाण्याचं... बाप्पासाठी साकारला तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक देखावा

Ganesh Chaturthi 2023 : आधी लगीन कोंढाण्याचं… बाप्पासाठी साकारला तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक देखावा

| Updated on: Sep 27, 2023 | 3:56 PM

VIDEO | नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहर हद्दीतील तळेगाव रोड येथील कुंडगर परिवाराने गणेशोत्सवानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील तानाजी मालुसरे यांचा साकारला ऐतिहासिक देखावा, 'आधी लगीन कोंढण्याचं मग आमच्या रायबाचं...', बघा लक्षवेधी व्हिडीओ

नाशिक, २७ सप्टेंबर २०२३ | राज्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अशातच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किंवा घरगुती गणेशोत्सवात आकर्षक आणि लक्षवेधी सजावट करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. इगतपुरी शहर हद्दीतील तळेगाव रोड येथील श्री मुद्रा आर्ट्स नावाने प्रसिद्ध असलेल्या कुंडगर परिवाराने गणपती निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक देखावा तयार केला आहे. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित कोंढाणा मुघलांच्या तावडीतून सोडवण्यासाठी मालुसरे यांनी मोहिमेचा विडा उचलला आणि मोहीम हाती घेतली, आधी लगीन कोंढण्याचं मग आमच्या रायबाचं. हा प्रसंग त्यांनी साकारला आहे. हा देखावा बनविण्यास त्यांना १५ दिवसाचा कालावधी लागला. कुंडगर परिवार दरवर्षी विविध देखावे सादर करत असतात आणि हे देखावे स्वतःच्या हाताने सर्व शाडू माती, कापड आणि लाकूड यापासून तयार करतात. त्यांच्या घरातील देखावे पाहण्यासाठी नागरिक आवर्जून येत असतात .

Published on: Sep 27, 2023 03:55 PM