Ganesh Chaturthi 2023 | छोट्याशा सुपारीवर पठ्ठ्यानं साकारलं बाप्पाचं देखणं रूप, बघा व्हिडीओ
VIDEO | राज्यभरात घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले आहे. सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय. परभणीतील कलाकार प्रमोद उबाळे यांनी सुपारीवर साकारले बाप्पाचे रूप, बघा सुंदर कलाकृतीचा व्हिडीओ
परभणी, २० सप्टेंबर २०२३ | राज्यभरासह देशभरात लाडक्या श्री गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. घरोघरी लाडक्या बाप्पाचे आमगन झाले असून बाप्पा मोठ्या उत्साहात भाविकांच्या घरी विराजमान झाला आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मालेगावच्या संदीप आव्हाड या कलाकाराने चक्क मोदकावरच लाडक्या बाप्पाचं चित्र रेखाटल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता परभणीच्या एका अवलिया कलाकाराने सुपारीवर बप्पाचं मनमोहक रूप साकारले आहे. त्यांचे नाव प्रमोद उबाळे असे असून त्यांनी लहानश्या सुपारीवर 1×1 सेंटीमीटर आकाराची सुंदर कलाकृती रेखाटली आहे. प्रमोद उबाळे यांनी ही गणेश बाप्पाची प्रतिकृती साकारल्याने सध्या त्याच्या या कलेचं जिल्ह्यात कौतुक होत आहे. गणपती बाप्पाचे असंख्य रूप आहेत. लहान असो की भव्यदिव्य पण ते तेवढंच मोहक असते. परभणीतील कलाकार प्रमोद उबाळे यांनी सुपारीवर बाप्पा साकारले आहेत. उबाळे यांनी एका सुपारी वर 1×1 सेंटीमीटर आकाराची गणेशाची अतिशय सुंदर अशी प्रतिकृती साकारली आहे. त्यासाठी त्यांना दोन तास लागले असल्याचे सांगितले जात आहे.