Mobile Thieft | झारखंडमधील मोबाईल चोरांच्या टोळीला नांदेड पोलिसांकडून अटक

Mobile Thieft | झारखंडमधील मोबाईल चोरांच्या टोळीला नांदेड पोलिसांकडून अटक

| Updated on: Jan 16, 2022 | 10:11 AM

महागडे मोबाईल चोरणाऱ्यां झारखंड राज्यातील पाच जणांच्या टोळीला नांदेड पोलिसांनी अटक केलीय. या टोळीत दोन अल्पवयीन बालकाचादेखील समावेश आहे. सतत प्रवास करत ही टोळी महागड्या मोबाईलची चोरी करत होती.

नांदेड : महागडे मोबाईल चोरणाऱ्यां झारखंड राज्यातील पाच जणांच्या टोळीला नांदेड पोलिसांनी अटक केलीय. या टोळीत दोन अल्पवयीन बालकाचादेखील समावेश आहे. सतत प्रवास करत ही टोळी महागड्या मोबाईलची चोरी करत होती. नांदेडच्या भाग्यनगर पोलिसांना काही लोकांचा संशय आल्याने ही टोळी पोलिसांच्या हाथी लागली. या टोळी पासून चोरी केलेले महागडे मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून या टोळीने इतरत्र आणखी कुठे चोरी केली का याचा तपास सुरू आहे.