महाशिवरात्रीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीला गंगास्नान
महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) मध्यरात्री १२ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Vitthal Rukhumani) समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची विधीवत पूजा करण्यात आली.
महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) मध्यरात्री १२ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Vitthal Rukhumani) समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी देवाला गंगेच्या (ganga) पाण्याने स्नान ही घातले. राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी 250 वर्षांपूर्वी सुरू केलेली गंगास्नानाची परंपरा आजही सुरू आहे.आहिल्यादेवी होळकर या शिवभक्त होत्या. त्यांची विठ्ठलभक्ती सर्वश्रुत आहे लाखो वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेला विदुराया हा शिव वैष्णवांचे प्रतीक मानले जाते. श्री विठ्ठलाच्या मस्तकी शिवलिंग आहे. राजमाता अहिल्याबाई यांनी महाशिवरात्री दिवशी गंगेच्या पाण्याचा महाभिषेक करण्यास सुरुवात केली. गंगा नदीचे उगम स्थान आलेल्या गंगोत्री येथून त्याकाळी कावडी मधून पाणी आणले जात होते. ही परंपरा आजही होळकर संस्थानच्या सहकार्याने जोपासली जाते.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

