Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी
गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले होते. ज्यामध्ये केवळ मुंबईकरच नाही तर देशभरातील भाविक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी व्हीव्हीआयपी आणि सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती.
गेले दहा दिवस भक्तिभावाने लाडक्या गणरायाची सेवा, आराधना केल्यानंतर आज त्यांना जड अंतःकरणाने निरोप देण्यात येत आहे. एकीकडे गणपती बाप्पाची आराधना करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत तर दुसरीकडे पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रतिक्षा आतापासूनच केली जात आहे. दरम्यान, मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची लगबगही पाहायला मिळत आहे. यापूर्वी लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न झाली आहे. गणपती बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीआधी लालबागच्या राजाची शेवटची आरती करण्यात आली. यावेळी भाविक भक्तांनी एकच मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर आपल्या लाडक्या राजाची आरती करताना काही भाविकांच्या डोळ्यात अश्रू तरळतांना पाहायला मिळाले. तर सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग बंद करण्यात आली होती तर मध्यरात्री १२ वाजल्यापासून मुखदर्शन रांग बंद करण्यात आले होते. विसर्जनाच्या तयारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.