पोलीस दलात नोकरी द्या, ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षे याची सरकारकडे मागणी
शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरीमध्ये उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. यानंतर शरद पवारांनी त्याला भेटीसाठी बोलवले होते.
14 जानेवारी रोजी पुण्यात 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार चांगलाच रंगला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे हा विजेता ठरला. शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड याचा पराभव करत चांदीची मानाची गदा पटकवत महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला. शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरीमध्ये उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. यानंतर शरद पवारांनी त्याला भेटीसाठी बोलवले होते.
शिवराज राक्षे याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्र केसरी हा पहिला टप्पा आहे. महाराष्ट्र केसरीच्या गदेवर समाधानी राहू नको, अजून पुढे वाटचाल कर, असा आशीर्वाद शरद पवार यांनी शिवराज राक्षेला दिला. यावेळी पुष्पगुच्छ देत शिवराजचे शरद पवारांनी कौतुकही केले. शरद पवार यांच्या भेटीनंतर, शिवराज राक्षे याने सरकारकडे सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी एकच मागणी केली.