डिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी
डिसले गुरुजींची रजा मंजूर झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामींनी डिसले यांचा अर्ज मंजूर केला आहे. सुटी मंजूर झाल्यानंतर डिसले यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि जिल्हा प्रशासनाचे आभार देखील मानले आहेत.
सोलापूर : परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे (ZP School) ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) विजेते शिक्षक रणजित डिसले (Ranjeet Disle) यांनी अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी रजेची मागणी केली होती. मात्र त्यांच्या रजेचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. इतकंच नाही तर डिसले गुरुजी यांच्या रजेचा अर्ज दीड महिन्यापासून अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून असल्याचंही बोललं जात होत. मात्र त्यानंतर या प्रकरणात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्ष घातलं. वर्षा गायकवाड यांनी लक्ष घातल्यानंतर अखेर रणजित डिसले यांचा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसले गुरुजींची रजा मंजुर झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामींनी डिसले यांचा अर्ज मंजूर केला आहे. सुटी मंजूर झाल्यानंतर डिसले यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि जिल्हा प्रशासनाचे आभार देखील मानले आहेत. त्यांनी याबाबत ट्विटरवरून पोस्ट करत माहिती दिली.