Gold Rate Hike : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार….
तुम्ही पण सोनं खरेदी करतात का? सोनं खरेदी करून सोन्यामध्ये गुंतवणूक करणं तुम्ही पसंत करता का? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण लवकरच सोन्याचे भाव वधारणार आहे
सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. गेल्या ९० दिवसात सोनं आणि चांदीचा दर इतक्या वेगाने वाढताना दिसतोय. त्यामुळे सोन्याचा दर लवकरच एक लाखाचा टप्पा गाठणार असल्याचे दिसतेय. फक्त ९० दिवसात म्हणजेच तीन महिन्यात १६ हजार रूपयांनी वाढलंय. सरत्या वर्षात ३१ डिसेंबर २०२४ ला सोन्याचा भाव हा ७६ हजार १६२ रूपये तोळा इतका होता. तर ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सोन्याचे भाव वधारून ८४ हजार २०७ रूपये प्रति तोळा झालंय. तर २ एप्रिल २०२४ रोजी सोन्यानं तब्बल ९२ हजारांचा आकडा गाठलाय. तर ज्यांनी सोनं खरेदी करून सोन्यात गुंतवणूक केली होती, त्यांना एकाच वर्षात सोनं गुंतवणुकीत २० टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळाल्याचे पाहायला मिळतंय. दरम्यान, १ जानेवारी २०२४ मध्ये प्रति तोळा सोन्याचे दर हे ६३ हजार ३५२ रूपये इतके होते. तर २ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचे भाव वधारून १० ग्रॅमसाठी ९२ हजार ७०० रूपयांपर्यंत पोहोचलंय.