‘बागेश्वर बाबांवर सरकार कारवाई करणार की गप्प बसणार?’, राष्ट्रवादीचा सवाल
VIDEO | साई भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या बागेश्वर बाबांवर सरकार कारवाई करणार की गप्प बसणार?, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा सवाल
ठाणे : बागेश्वर बाबा स्वतः ला हनुमानाचा अवतार समजतो की उपासक समजतो ते माहीत नाही. मात्र लोकांच्या श्रध्दा स्थानावर बोलण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला. राज्यात भाजप-शिंदेचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोट्यवधी अनुयायांच्या भावना दुखावणाऱ्या बागेश्वर बाबांवर काय कारवाई करणार की सरकार गप्प बसणार असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी भाजप पुरस्कृत काही महाराज महाराष्ट्रात येवून महाराष्ट्राच्या संताचा वारंवार अपमान करत आहे. काल साई बाबांबद्दल वक्तव्य करण्यात आलं. साई बाबांबद्दल बोलून लाखो करोडो भक्तांच्या भावना दुखावण्यात आल्या. ज्या भाजपने बागेश्वर बाबांचा कार्यक्रम आयोजित केला तो भाजप याबद्दल एकही शब्द काढायला तयार नाही. धर्म भेद जाती भेद विसरून माणुसकीला प्रोत्साहन देणारे साई बाबा होते, असेही त्यांनी सांगितले.