मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिला शब्द, म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिला शब्द, म्हणाले…

| Updated on: Feb 28, 2023 | 9:32 PM

VIDEO | राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघा व्हिडीओ

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. दरम्यान, आज कांद्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. आक्रमक झालेल्या विरोधकांनी नाफेडमार्फत कांदा खरेदी करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारच्यावतीने भूमिका स्पष्ट केली. कांद्याचे भाव घसल्याने शेतकरी अडचणीत आलाय, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे नाफेडकडूनही खरेदी सुरू करण्यात आली आहे. तर हे सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हे शेतकऱ्यांचं सरकार नक्कीच दिलासा देईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. शेतकरी अडचणीत आल्यास हे सरकार कोणतेही नियम डावलून निकषात न बसणारा निर्णय देखील सरकारने घेतल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत पाठिशी असल्याचे आश्वासनही दिले.

Published on: Feb 28, 2023 09:32 PM