Grampanchayat Election : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Grampanchayat byelection in maharashtra : राज्यात आज ग्रामपंचाय निवडणुकांना सुरूवात झाली आहे. राज्यातील 2 हजार 500 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक होत आहे. 130 रिक्त सरपंचपदासाठी आज मतदान होणार आहे. तर आज झालेल्या या मतदानाचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.
मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ | राज्यात आज ग्रामपंचाय निवडणुकांना सुरूवात झाली आहे. राज्यातील 2 हजार 500 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक होतेय. 130 रिक्त सरपंचपदासाठी आज मतदान होणार आहे. तर आज झालेल्या या मतदानाचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. तर या निवडणुकीत राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर, पंकजा मुंडे, संदीप क्षीरसागर, धनंजय मुंडे, अमरसिंह पंडीच, लक्ष्मण पवार यासह सुरेश धस बाळासाहेब आजबे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अहमदनदरमध्ये राधाकृष्ण पाटील, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब नाहटा, निलेश लंके, रोहित पवार, राम शिंदे, प्राजक्त तनपुरे, शिवाजी कर्डीले, मोनिका राजळे हे आमने-सामने आहेत. तर बुलढाणामधून संजय गायकवाड, हर्षवर्धन सपकाळ, विजयराज शिंदे, चैनसुख संचेती, आकाश फुंडकर, संजय कुटे यांच्यासह यवतमाळमध्ये कोणत्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली बघा…