डोंबिवली येथील कोपर वेस्टमध्ये इमारत कोसळली अन्…
VIDEO | डोंबिवलीच्या कोपर वेस्टमध्ये इमारतीखालील एका दुकानदार चक्कीवाल्याने या इमारतीतील रहिवाश्यांना माती कोसळत असल्याचे सांगितले. तर इमारतीत पाच कुटुंब राहत असून अचानक पडलेल्या इमारतीत या कुटुंबाचे सर्व सामान इमारतीत दबलं गेल्याने संसार उध्वस्त झाल्याची प्रतिक्रिया रहिवाश्यांनी दिली
डोंबिवली, ३ ऑक्टोबर २०२३ | डोंबिवलीतील कोपर वेस्ट परिसरात ग्राउंड प्लस दोन मजली धोकादायक इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. कोपर वेस्ट परिसरात असणाऱ्या इमारतीची माती कोसळत असल्याचे इमारतीत असलेल्या चक्कीवाल्याच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. इमारतीची माती कोसळत असल्याचे इमारतीत असलेल्या चक्कीवाल्याच्या लक्षात येताच इमारतीत राहणाऱ्या कुटुंबाला बाहेर येण्यास सांगितले त्यामुळे मोठी दुर्दैवी टळली असल्याचे सांगितले जात आहे. डोंबिवलीतील कोपर वेस्ट परिसरात इमारतीत पाच कुटुंब राहत असून अचानक पडलेल्या इमारतीत या कुटुंबाचे सर्व सामान इमारतीत दबलं गेल्याने संसार उध्वस्त झाल्याची प्रतिक्रिया या इमारतीतील रहिवाश्यांनी दिली. या घटनेनंतर महानगरपालिका कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि इतर शासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने इमारत पाडण्याचं काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.